आमच्या ग्रामपंचायतीबद्दल
अडसरे खुर्द, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील ग्रामपंचायत आणि त्यातील वाडया वस्त्या - गिरांगेवाडी.
ग्रा.पं. ची लोकसंख्या ११५०+
मतदार संख्या :- स्त्री 608 पुरुष 542 एकूण 1150
ग्रामपंचायतीचे नाव – अडसरे खुर्द ता इगतपुरी जि.नाशिक
सरपंचाचे नाव :- श्री. काळू रावजी साबळे
उपसरपंचांचे नाव :- श्री. हिरामण लहाणू भांगरे
ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव :- श्री. अमित उत्तम पालवे
प्रस्तावना
अडसरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील, नाशिक जिल्ह्यातल्या, इगतपुरी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे. इगतपुरी हे उत्तर महाराष्ट्र विभागातील इगतपुरी पट्यात मोडते. गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११५० इतकी आहे तसेच येथील घरांची एकूण संख्या ३०० इतकी आहे. येथील स्त्रियांची लोकसंख्या एकूण लोकसंखेच्या ३९.५% इतकी असून स्त्री साक्षरतेचे प्रमाण ५५% आणि एकूण साक्षरतेचे प्रमाण ८०% इतके आहे. अडसरे खुर्द गाव नाशिक जिल्ह्यापासून ४५ कि.मी. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून १०६ किमी वर स्थित आहे. अडसरे खुर्द पिनकोड ४२२४०३ हा असून त्याचे पोस्ट ऑफिस टाकेद बुद्रुक येथे आहे.
कडवा नदीकाठी वसलेल्या अडसरे खुर्द गावास पौराणिक, आध्यात्मिक व इतिहासकालीन वारसा आहे. दंडकारण्यातील हा परिसर असून, गावात कडवा तीरावर आहे.
काही वर्षांपूर्वी पंचवटी येथून रावण सितामाईचे हरण करून जात असतांनी श्री जटायु पक्षानी रावणास अडवून त्या सोबत युद्ध केले त्यामुळे रावणाच्या मार्गात अडसर निर्माण केले त्यामुळे अडसरे असे नामकरण केले गेले आहे अशी पौराणिक कथा आहे त्याच प्रमाणे सुमारे ३० वर्षांपासून गावात बोहाडा हा उत्सव चैत्र व वैशाख महिन्यादरम्यान साजरा केला जातो. आजही ही परंपरा चालू आहे. कडवा नदीच्या खोऱ्यामुळे गाव परिसर सुजलाम् सुफलाम् असून, येथील बागायत शेती व फळबाग फुलशेती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचली आहे. गावात जिल्हा परिषद शाळा असून शैक्षणिक क्षेत्रातही गावाने आपला ठसा उमटवला आहे. गावात पौराणिक मंदिरे असून वरसूआई देवी यात्रा उत्सव साजरा केला जातो. तसेच गणेशोत्सव काळात जीवंत देखावे दाखवले जातात.
अडसरे खुर्द गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेने पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाची लोडशेडिंगला पर्याय २४ तास वीज. कृषी क्षेत्रात सन १९७०-८५ च्या दरम्यान अडसरे खुर्द हे भाजीपाला उत्पादनाचे आगर म्हणून प्रसिद्ध होते. कालौघात येथील शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरत आज गावात सुमारे ३ पॉलिहाउस उभारली असून, त्यात फुलशेती, काकडी, मिरची आदी पिके घेतात.
ग्रामपंचायतीने गावाच्या विकासा बरोबर शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये इंदीरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, अपंगासाठी शासनाचे योजनेतुन साहीत्य वाटप, राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना हया सारख्या शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवुन दिला आहे.
ग्रामपंचायत दरवर्षी उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने विविध प्रकारे प्रयत्न करत असुन सध्या ग्रामपंचायतीचे वार्षीक निव्वळ उत्पन्न ३ ते ४ लाख रूपये पर्यंत आहे. तसेच ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मुलभुत सोयी सुविधा तसेच समाज उपयोगी अनेक विकासकामे करून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अडसरे खुर्द गावातील संपुर्ण रस्ते डांबरीकरण / काँक्रीटीकरण करण्याचे काम पुर्णत्वास येत आहे. त्यासाठी स्थानिक आमदार निधी, ठक्कर बाप्पा योजना, पर्यावरण योजना निधी, जनसुविधा निधी द्वारे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. गावातील सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत संपुर्ण गावात भुमिगत गटार बांधण्यात आल्या आहेत
गावातील प्रमुख व्यवसाय :- शेती, कृषी क्षेत्रात सन १९७०-८५ च्यादरम्यान अडसरे खुर्द हे फुलशेती, काकडी, मिरची, टोमॅटो, कांदा आदी पिके घेतात. तसेच लहान-मोठ्या उद्योजकांनी शेतीपूरक उद्योग या परिसरात सुरू केल्यामुळे शेतक-यांसोबतच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.
ग्राहक अभिप्राय
अडसरे खुर्द ग्रामपंचायतीतील लोकांचे अनुभव
सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावासाठी केलेले काम आम्हाला खूपच आवडले.
सुरेश पाटील
इगतपुरी
ग्रामपंचायतने वाडया वस्तीत स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
मीनाक्षी सावंत
नाशिक
